सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण उद्या
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा १९ रोजी सकाळी १५ वाजता सावंतवाडी येथील गोंविद चित्रमंदिर बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार दीपक केसरकर, गोवा-मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, जिल्हा बैंक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत-भोसले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड. संतोष सावंत, गणेश जेठे, मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी वसंत केसरकर, गजानन नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये तरुण भारत संवादचे डेस्क इन्चार्ज अवधूत पोईपकर, तरुण भारत संवादचे पत्रकार महादेव परांजपे, नागेश पाटील, प्रवीण परब, नाट्यकर्मी विश्वनाथ नाईक, अजित दळवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.