You are currently viewing बीडवलकर हत्या प्रकरणात वैभव नाईक यांना पोलीस चौकीशीला सामोरे जावेच लागणार

बीडवलकर हत्या प्रकरणात वैभव नाईक यांना पोलीस चौकीशीला सामोरे जावेच लागणार

*पोलिसांनी मला बोलावलं तर, स्टेटमेंट देईन आणि पुरावेही सादर करेन*

 

*सिद्धेश शिरसाट दहा वर्ष वैभव नाईक यांच्याच आश्रयाखाली*

 

*आमदार डॉ. निलेश राणे यांची पत्रकार परिषद*

कुडाळ :

बिडवलकर हत्या प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना चौकशीला सामोरे जावेच लागेल, या प्रकरणाची दोन वर्ष दबक्या आवाजात चर्चा होती, याची कल्पना वैभव नाईक यांना होती तर, त्यांनी पोलिसांचे लक्ष का वेधले नाही? गुन्हा लपवून ठेवला, हा क्राईम आहे, असा आरोप आमदार डॉ. निलेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. वैभव नाईक यांनी बिडवलकर याचा व्हिडिओ स्वतःच्या पेजवर, सोशल मीडियावर व्हायरल केला, पोलिसांना का दिला नाही ? असा सवालही डॉ. राणे यांनी उपस्थित केला.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, दीपक नारकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

बिडवलकर याची दोन वर्षांपूर्वी हत्या झाली. त्यानंतर या घटनेची दबक्या आवाजात चर्चा होती. असे आमदार वैभव नाईक सांगतात. त्यावेळी वैभव नाईक हे आमदार होते. मग आवाज का नाही उठवलात? 2019 मधील बिडवलकर याचा व्हिडिओ वैभव नाईक यांनी स्वतःच्या पेजवर, सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर बीडवलकर याची नातेवाईक मालती चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. याकडेही डॉ. निलेश राणे यांनी लक्ष वेधले.

या प्रकरणातील दुसरा आरोपी अमोल शिरसाट हा वैभव नाईक यांच्यासोबत नाचतानाचा व्हिडिओ आहे. याचा अर्थ दहा वर्ष अवैद्य व्यवसायात ज्यांचा सहभाग सहभाग होता ते वैभव नाईक यांच्या आश्रयाखाली होते का? असा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रकरणात पोलिसांनी मला बोलावलं तर मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. पुरावेही देईन, सखोल तपास होण्यासाठी आंदोलन करावे लागले तरी करेन, वैभव नाईक यांची या प्रकरणात चौकशी झालीच पाहिजे, सिद्धेश शिरसाट हा कुणाच्या आश्रयाखाली होता हे कळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा