You are currently viewing गांधी चौकातील सुशोभीकरणाच्या श्रेयवादावरून नगरसेविका प्राजक्ता बांदेकर आक्रमक

गांधी चौकातील सुशोभीकरणाच्या श्रेयवादावरून नगरसेविका प्राजक्ता बांदेकर आक्रमक

नगरसेवकांना विश्वासात न घेता कार्यक्रम केल्यास….

कुडाळ गांधी चौकातील सुशोभीकरनाला शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता.आता हे काम पूर्णत्वास जात आहे हे लक्षात आल्यावर नगरपंचायतीत असलेल्या महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांनी त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे, पण असे फुक्याचे श्रेय घेण्यापेक्षा नव्याने कामे घेऊन या आणि ती पूर्णत्वास आणा मग समजेल तुम्ही सत्तेचा वापर शहराच्या विकासासाठी केला आहात, अशी टिका भाजपा नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी केली आहे.

कुडाळ शहरातील गांधी चौक येथे सुशोभिकरण करण्यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली आणि माझी नगरसेवक आबा धडाम यांनी प्रयत्न सुरू केले होते यासाठी गांधी चौक सुशोभिकरण झाल्यावर कसा दिसेल याचा आराखडाही तयार करण्यात आला होता.२०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती, मात्र या कामाला शिवसेनेचे काही पदाधिकारी यांनी कडाडून विरोध केला त्यामुळे हे काम रखडले होते. दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर पहिल्या सभेमध्ये या सुशोभीकरणाचा विषय मांडून सुशोभीकरण लवकरात लवकर केले जावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्यानंतर या सुशोभीकरणाला गती मिळाली, हे सुशोभीकरण आता पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांचे डोळे फिरले आहेत. या सुशोभीकरणाचे श्रेय घेण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येत आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी या सुशोभीकरणाच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला होता आणि यामध्ये गांधी चौक मित्र मंडळाच्या काही सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र गांधी चौक मित्र मंडळातील इतर सदस्य तसेच नागरिक यांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. जेव्हा हे काम ३० एप्रिल रोजी रोखण्यात आले त्यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट हे या ठिकाणी आले होते. आणि त्यांनी सांगितले की या सुशोभीकरणाचे उद्घाटन गांधी चौक मित्र मंडळाच्या वतीने केले जाणार आहे. नगरपंचायतीच्या वतीने त्यानंतर उद्घाटन केले जाईल, असे सांगितले जर गांधी चौक मित्र मंडळाच्या
वतीने या सुशोभीकरणाचे उद्घाटन हाती घेतले असते तर गांधी चौक मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना आमंत्रित केले असते, मात्र गांधी चौक मित्र मंडळाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधारी नगरसेवकांपैकी कोणीतरी एक नगरसेवक चाप ओढण्याचे काम करत होता हे सर्वांच्याच लक्षात आले. मुळात या सुशोभीकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आपण करत असलेली लपवाछपवी दाखवून दिली.जोपर्यंत गांधी चौक येथे सुशोभीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत उद्घाटन करू नये ही भूमिका आम्ही घेतल्या नंतर पहाटे ६ वाजता उद्घाटनाचा घाट घालणा-या सत्ताधाऱ्यांना हे उद्घाटन थांबवावे लागले आता गांधी चौक मित्र मंडळातील सदस्य तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन हे उद्घाटन लवकरच होणार आहे. नगरपंचायत येथील महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांकडून अशाप्रकारे वारंवार लपवाछपवी करून कार्यक्रम घेतले जात आहे. यापुढे नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन जर कार्यक्रम घेतले गेले नाहीत तर योग्य उत्तर देण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + two =