You are currently viewing वैभववाडीत शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ..!

वैभववाडीत शिवसेनेकडून प्रचाराचा शुभारंभ..!

वैभववाडी

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शिवसेनेने शुभारंभ केला आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. त्यापैकी मांगवली ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. उर्वरित १२ ग्रामपंचायतीमधील ७० जागासांठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. शिवसेनेकडून या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. कोकीसरे, सोनाळी, भुईबावडा, ऐनारी याठिकाणी मंदिरामध्ये नारळ ठेवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. प्रचार शुभारंभ प्रसंगी सावंत म्हणाले,ग्रा.प.निवडणुका शिवसेना विकासाच्या मुद्यावर लढवत आहे. महाविकास आघाडी पँनेलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

सोनाळी ग्रा.प.प्रचाराचा शुभारंभ पावणाई मंदिरात नारळ ठेवून करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके,संदेश पटेल, संघटक अशोक रावराणे, उद्योजक अशोक चव्हाण,बाबा बोभाटे, महेश सुतार, भिमराव भोसले,नितेश शेलार,परशुराम तळेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 12 =