You are currently viewing महागाई विरोधात काँग्रेस तर्फे जनजागरण अभियान

महागाई विरोधात काँग्रेस तर्फे जनजागरण अभियान

दोडामार्ग येथे तालुका काँग्रेसची बैठक

दोडामार्ग

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार या महागाई विरोधात काँग्रेस तर्फे जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. आज दोडामार्ग येथे तालुका काँग्रेसची बैठक घेण्यात आली त्यानंतर दोडामार्ग बाजारपेठेतून महागाईच्या विरोधात जनजागरण फेरी काढून पत्रके वाटण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव बाळा धाऊसकर, सुभाष दळवी, शहर अध्यक्ष सुधीर गवस, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, सुमंत मणेरीकर, सुधीर चांदेलकर, बाबू गवस, आशा जाधव, शिवदास मणेरीकर, अंकुश गवस, राजन साळकर, गुणाजी गवस, आनंद नाईक, किशोर लोंढे, सत्यवान गवस, शुभम गवस इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सेख्येने उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 9 =