You are currently viewing दारुम माळवाडीच्या वळणावर झालेल्या अपघातात दोघे गंभीर

दारुम माळवाडीच्या वळणावर झालेल्या अपघातात दोघे गंभीर

तळेरे : प्रतीनिधी

 

कासार्डे विजयदुर्ग रोड वर ओझरम फाट्याच्या पुढील वळणावर मोटर सायकल व फोर व्हीलर याच्या मध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कणकवली या ठिकाणी पुढील उपचारासाठी ताबडतोब हलविण्यात आले आहे.

या बाबतप्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,मुटाट हुन घाडी आडनावाचे दोन युवक आपल्या होंडा MH 09 DZ 0291 या गाडी वरून कासार्डेच्या दिशेने येत असता दारूम माळवाडी येथील वळणावर आपल्या पुढील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या महिंद्रा TUV 300 गाडी नं. MH 07 AB 1975 या चारचाकी गाडीला क्लीनर साईडच्या समोरील बाजूस जोरदार आपटल्याने दोघेही मोटार सायकल वरून उडून दूर जाऊन पडले. यात दोघांनाही जबर मार लागला असला तरी मागे बसलेल्या घाडी यांच्या पायाला फॅक्चर झाल्याचे समजते.दोघेही अदांजे 25वर्षाचे आहेत.या दोघानांही वैद्यकीय उपचारासाठी 108नं. च्या गाडीने कणकवली येथे घेवून गेल्याचे समजते.

तर कुडाळहुन उंडील ता. देवगड येथे असलेल्या नैना फुड्स, या फॅक्टरीच्या कामानिमित्त जात असलेले नागेश चव्हाण वय अंदाजे 35 वर्ष यांची महिंद्रा गाडी क्रं. MH 07 AB 19 75 च्या दर्शनी बाजूवर दुचाकी येवून आपटल्याने क्लीनर बाजूचे नुकसान झाले. तर दुचाकीच्याही समोरील बाजूचा चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कासार्डे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सुपल ,ट्राफिक हवालदार R.G. जामसंडेकर ,पोलीस कॉन्स्टेबल P. S. पार्सेकर ,दारूम पोलीस पाटील संजय बिळसकर आदींनी घटनास्थळी धाव घेवून रितसर पंचनामा केला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शना खाली केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 9 =