You are currently viewing पाकवादी घोषणा देणार्‍या युवका विरोधात सावंतवाडीत मनसेकडुन निदर्शने…

पाकवादी घोषणा देणार्‍या युवका विरोधात सावंतवाडीत मनसेकडुन निदर्शने…

सावंतवाडी

पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी (ED) आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.

या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 60 ते 70 कार्यकर्त्यांचा समावेश होता.त्यांच्यावर कठोर कारवाई करणेत यावी.

यावेळी काही आंदोलनकर्त्यानी “पाकिस्तान जिंदाबाद”, अल्लाहु अकबर अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सन्मा.राजसाहेब ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असं मा.राज साहेबांनी म्हटलं आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदूच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा,ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं मा. राजसाहेबांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

म्हणुनच व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे,संबधितांवर देशद्रोह्याच्या गुन्ह्याखाली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सावंतवाडी मनसेकडून करीत आहेत.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री संतोष भैरवकर कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मंदार नाईक कुणाल किनळेकर बाबल गावडे दीपक गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत कौस्तुभ नाईक सुरेंद्र कोठावळे प्रवीण गवस आबा चीपकर मनोज कांबळी विष्णू वस्कर वैभव धुरी मंदार सुभेदार आदी उपस्थित होते

 

प्रतिक्रिया व्यक्त करा