You are currently viewing कासार्डे माध्य. विद्यालय मुख्यमंत्रीपदी कु.कस्तुरी मुंडले तर उपमुख्यमंत्रीपदी कु. कोमल पाताडे यांची बिनविरोध निवड

कासार्डे माध्य. विद्यालय मुख्यमंत्रीपदी कु.कस्तुरी मुंडले तर उपमुख्यमंत्रीपदी कु. कोमल पाताडे यांची बिनविरोध निवड

तळेरे: प्रतिनिधी

कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे शालेय मुख्यमंत्रीपदी इ.१०वी तील कु. कस्तुरी अतुल मुंडले तर उपमुख्यमंत्रीपदी इ.१२वी मधील कु.कोमल शिवराम पाताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सन.२०२२/२३ या शैक्षणिक वर्षांकरिता कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शालेय निवडणूक अधिकारी दत्तात्रय मारकड, सहायक निरीक्षक नवनाथ कानकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षणाखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.
शालेय निवडणूकीत प्रथमच दोन्ही महत्त्वाच्या पदांवर मुलींनी बाजी मारली आहे.

*सन.२०२२/२३ शालेय मंत्रीमंडळ*

*शालेय मुख्यमंत्री-* कु. कस्तुरी मुंडले,
*उपमुख्यमंत्री-* कु.कोमल पाताडे,
*सांस्कृतिक मंत्री* -कु.प्राची पाळेकर , राज्यमंत्री -कु सलोनी पाताडे, कु.शिवानी जाधव, *सहलमंत्री-* भावेश सावंत राज्यमंत्री- रोहन पवार, जतिन लाड,
*क्रीडामंत्री*- वैभव माने राज्यमंत्री- विश्वास चव्हाण कु.नेहा पन्हाळकर,
*शिस्तमंत्री-* कु. प्रेरणा गाडे, राज्यमंत्री- पद्माकर सावंत कु.केतकी प्रभुदेसाई, *पर्यावरण मंत्री*-
कु.आर्या पाताडे, राज्यमंत्री- कु.वैदही पाताडे, कु.श्रेया इंदुलकर,
*वाचन मंत्री -* कु.प्रणाली परब, राज्यमंत्री कार्तिकी गाडे,
*आरोग्य मंत्री-*
निखिल गायकवाड राज्यमंत्री- मितेश चोरगे, *स्वच्छता मंत्री-* कु.पूजा बिळसकर , राज्यमंत्री -समीर तोरस्कर ,कु.स्नेहल पाताडे, *पाणीपुरवठा मंत्री-* मयुरेश तावडे, राज्यमंत्री -कु.तन्वी गुरव
या नूतन मंत्रीमंडळाचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर,सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर,सर्व पदाधिकारी, शिक्षण समितीचे चेअरमन अरविंद कुडतरकर, सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


कासार्डे: कासार्डे विद्यालय संस्था पदाधिकारी, प्राचार्य , पर्यवेक्षक व शिक्षक- शिक्षकेतील कर्मचाऱ्यांच्या सोबत नुतन शालेय मंत्रिमंडळ

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + seventeen =