ग्रा.प. कर्मचार्यांचे उपोषण मागे !
सिंधुदुर्ग :
शासानाने ग्रा.पं.कर्मचार्यांना जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवेने १०/% आरक्षण लागू केलेले आहेत. त्यानूसार ज्या ग्रा.पं.कर्मचार्यांची कार्यालयात दहा वर्षाहून कमी नसेल इतकी सलग पूर्ण वेळ सेवा असेल असा ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा सेवेतील वर्ग -३ व ४ च्या कोणत्याही पदावर नियुक्तीसाठी पात्र असेल अशी नियुक्ती ग्रा.प.कर्मचार्यांच्या सेवा जेष्ठतेच्या आधारे संबधित जिल्हा परिषदच्या मुख्ख कार्यकारी अधिकार्यांकङून करण्यात येईल, असे शासनाचे निर्देश असताना जिल्हा परिषदेच्या संबधीत विभागाकङून नेमणूका दिल्या नाहीत, यासाठी गेली २ वर्षे वारंवार पाठपुरावा करुन सुध्दा नियुक्ती मिळाली नाही. या अन्यायासाठी व इतर सेवा शर्तीसाठी जिल्हा परिषद समोर ओरस येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संजय पङतेनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आश्वासनाअंती उपोषण मागे घेण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद मुख्ख कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी ग्रा.प.कर्मचार्यांवर झालेल्या अन्यायाबाबत उपोषण स्थळी भेट दिली. मागण्या जाणून घेतल्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. ग्रा.प.कर्मचार्याची गेली २ वर्षे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी शासनाकङे मागणी करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद सेवेत १०% पदभरतीत गेली २ वर्षे टाळाटाळा केली असेल याबाबत तपासणी करण्यात येईल तसेच यापुढे जिल्हा परिषद भरती प्रकिया राबविताना संघटनेसोबत सभा घेण्यात येईल, व ग्रा.प.कर्मचार्यांच्या सेवा बिषयक बाबींबाबत अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्ख कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमूख संजय पङते उपस्थित होते. तसेच संघटना जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर, सावंतवाङी तालुकाध्यक्ष गुरुनाथ घाङी, जिल्हा सचिव, सुहास बांबार्ङेकर, सदस्य हनूमान केदार, गोविंद आसोलकर, अशोक जाधव, दत्तप्रसाद परब, राजन नाईक, सूहास साटेलकर, शांताराम जाधव, न्हानू घाटकर, उत्तम अमरे, शिवराम धुरी, संकेत कवठणकर, राजन राऊळ, श्रीम.सोनाली साळगांवकर सहीत बरेच कर्मचारी उपस्थित होते. आश्वासना अंती उपोषण मागे घेण्यात आले.