You are currently viewing 18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

 सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 3 सप्टेंबर  2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

              लसीकरण सत्राच्या ठिकाणी कोवीड – 19 प्रतिबंधात्‌मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, नागरिकांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, लसीकरण सत्राची वेळ सकाळी 9 ते 5 अशी राहील. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. शहरी भागात ( RH/ SDH/ DH) 50 टक्के डोस ऑनलाईन व 50 टक्के डोस ऑफलाईन उपलब्ध असतील. ग्रामीण भागात 10 टक्के डोस ऑनलाईन व 90 टक्के डोस ऑफलाईन उपलब्ध असतील. ऑनलाईन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे डोस राखीव ठेवण्यात येतील. ऑनलाईन नोंदणीकरिता बुकिंग स्लॉट दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 10 वा. उपलब्ध होतील. दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना (ज्यांना पहिला डोस घेतल्यावर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना) लसीकरण करण्यात येईल. तरी 18 वर्षावरील पात्र नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

              या लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. वैभववाडी तालुक्यात नानिवडे – 90. कणकवली तालुक्यात तांबल खान स्कूल – 110, कलमठ – गावडेवाडी – 60.  देवगड तालुक्यात इळिये – 10, ग्रामीण रुग्णालय देवगड – 50. मालवण तालुक्यात पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय – 150. कुडाळ तालुक्यात वालावल – 20, कुडाळ ग्रामीण रुग्णालय – 10, जिल्हा सामान्य रुग्णालय – 160. वेंगुर्ला तालुक्यात परुळा – 60, रेडी – 120, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय – 60, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा – 180, सावंतवाडी तालुक्यात सांगेली – 20. दोडामार्ग तालुक्यात परमे – 90, मुलास – 90, उसप – 90, तांबुळी – 90, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग  – 120 अशा एकूण 1 हजार 580 लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =