You are currently viewing शिवसेना सत्तेत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्‍य : लवू वारंग

शिवसेना सत्तेत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्‍य : लवू वारंग

भविष्यात हक्काचा आरक्षणासाठी मराठा समाज संघर्षासाठी सज्ज…

सिंधुदुर्ग :

मराठा आरक्षणाला महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारमधील शिवसेना व काँग्रेसचा नेहमीच विरोध राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे समोर एक आणि मागे एक अशी दुटप्पी भूमिका नेहमीच होती. महा विकास आघाडीतील या पक्षांना मनापासून आरक्षण द्यायचे नव्हतेच. हे राजकीय पक्ष सत्तेवर असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण कधीच मिळणार नाही.त्यामुळे सरकार विरोधी आंदोलनास मराठा बांधवांनी तयार रहावे असे आवाहन मराठा समाजाचे सिँधुदुर्गातील ज्येष्ठ नेते आणि आरक्षण समितीचे समन्वयक लवू वारंग यांनी केले. मराठा आरक्षणाला शिवसेनेने नेहमीच विरोध केला आहे. म्हणूनच मराठा मोर्चाची आपल्या मुखपत्रातून सेनेने कुचेष्टा केली होती.

मात्र मराठ्यांच्या ताकदी पुढे नमते घेऊन राहिलेली शिवसेना सत्तेत अधिकार येताच हे आरक्षण मराठ्यांना कसे मिळणार नाही याचा सर्वांगिण विचार करून न्यायालयात ठोस बाजू मांडली नाही. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील मराठा विरोधी नेते सहभागी आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत असा इशारा लवू वारंग यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + seven =