You are currently viewing युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने साटेली येथे केक बनविणे प्रशिक्षण शिबीर संपन्न…

युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने साटेली येथे केक बनविणे प्रशिक्षण शिबीर संपन्न…

बांदा

युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले केक बनविणे प्रशिक्षण शिबीर साटेली येथे संपन्न झाले. या शिबिराचा लाभ महिलांनी मोठ्या संख्येने घेतला.

शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच मनीषा जाधव, उपसरपंच यशवंत नाईक, ग्रामसेवक एस. एस. जाधव, युवा मित्र मीनल साटेलकर, युवा परिवर्तन संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शशिकांत सातार्डेकर, अमिता पालव, रसिका नाईक आदी उपस्थित होते.

सरपंच सौ. जाधव म्हणाल्या की, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून लघु उद्योग उभारणीसाठी महिलांनी संघटीतरीत्या एकत्र यावे, यासाठी लागणारे सहकार्य ग्रामपंचायत मार्फत देण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक शशिकांत सातार्डेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल साटेलकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा