You are currently viewing सिंधुदुर्गातील ११ पोलीस कर्मचारी “पोलीस महासंचालक” पदकाने सन्मानित…

सिंधुदुर्गातील ११ पोलीस कर्मचारी “पोलीस महासंचालक” पदकाने सन्मानित…

पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते गौरव; महाराष्ट्र दिनाचे औचित्य…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ११ पोलीस कर्मचाऱ्यांना “पोलीस महासंचालक पदक” देऊन गौरव करण्यात आला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संदीप राठोड, दर्शन उर्फ मुकुंद सावंत, विनायक पवार, सुनीलदत्त सुर्वे, प्रकाश गवस, मनोज राऊत, प्रीतम कदम, अनिल धुरी,अनिलकुमार खंडे, किरण देसाई, योगेश सातोसे आदींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित नायर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा