You are currently viewing कणकवलीतील रिंग रोड चा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू करणार

कणकवलीतील रिंग रोड चा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू करणार

रिंग रोड कामाच्या भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली :

कणकवली शहरातील रिंग रोड च्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आज करत असताना येत्या काळात दुसरा टप्पा देखील सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या रस्त्याचे काम सुरु होण्या करिता उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच जमीन मालकांनी देखील नगरपंचायत ला महत्त्वाचे सहकार्य केल्यामुळे हा रस्ता आज अस्तित्वात येऊ शकणार आहे. त्यामुळे या सर्वांचे मी कणकवली नगरपंचायत च्या वतीने शतशः ऋणी राहील असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली शहरातील टेंबवाडी ते रवळनाथ मंदिर अशा डीपी प्लान मधील रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन तेथील ज्येष्ठ ग्रामस्थ जनार्दन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष श्री नलावडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, कणकवली शहरातील नवनवीन रस्ते विकसित होण्याबरोबरच विकास प्रक्रिया गतीने होण्याकरिता उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी जी मेहनत घेतली त्याला आता फळ येताना पाहायला मिळत आहे.रिंग रोडच्या सुतारवाडी पर्यंत च्या टप्प्याची मोजणी देखील करण्यात आली आहे. असेही श्री नलावडे यांनी यावेळी सांगितले. या कामासाठी विशेष पाठपुरावा करणाऱ्या उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत नगरसेवक रवींद्र गायकवाड, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, प्रतीक्षा सावंत, कविता राणे, शिशिर परुळेकर, बाळा पाटील, बाळा सावंत, सहदेव बागवे माजी नगरसेवक अभय राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, सामाजिक कार्यकर्ते संजय मलांडकर, विजय राणे, मिथुन ठाणेकर, भरत उबाळे, सोहम हर्णे, राहुल हर्णे, राज नलावडे व जमीन मालक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =