You are currently viewing जिल्हास्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम…

जिल्हास्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम…

सावंतवाडी

सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व वराडकर वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वराड, मालवण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय खुल्या रांगोळी स्पर्धेत नेमळे येथील कु. सायली मिलिंद भैरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने मिळवलेल्या या याबद्दल युवासेनेेकडून तिचे कौतुक होत आहे. यापूर्वी देखील तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिक प्राप्त केले आहे.

यावेळी सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिरच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा