You are currently viewing पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल प्रकाश गवस यांना पोलिस पदक जाहीर

पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल प्रकाश गवस यांना पोलिस पदक जाहीर

उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार पदकाचे वितरण

सिंधुदुर्ग पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सिंधुदुर्ग पोलिस दलातील जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी व पोलिस दलात राहून देखील सर्वसामान्या करिता माणुसकी जपणारे सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांना राज्याच्या पोलिस महासंचालकां कडून जाहीर करण्यात येणारे पोलीस पदक जाहीर झाले आहे. प्रकाश गवस हे गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहतूक पोलीस म्हणून सर्वपरिचित आहेत. अनेकदा आपले कर्तव्य बजावत असताना अपघात घडू दे किंवा कुणालाही अचानक मदतीची गरज भासू दे प्रकाश गवस हे अपघातातील जखमी चे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करतात. त्यांना उद्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस परेड ग्राउंड येथे या पदकाचे वितरण करण्यात येणार आहे. पदका बद्दल प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + four =