You are currently viewing ‘शब्दगुज’..

‘शब्दगुज’..

*विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या… “नागपूरची सुगरण” म्हणून ई-टीव्हीवरील “मेजवानी” कार्यक्रमात प्रतिनिधित्व केलेल्या लेखिका कवयित्री निवेदिका प्रा. सौ.स्मिता रेखडे यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*’ शब्दगुज ‘*

 

शब्द शब्द उमटता होई ,

सवांद मनाशी

शब्दावीण न कळे मनाला,

साद कुणाची !

शब्द शब्द रेखता भाव,

जपता भावनेशी

अनोळखी ही शब्द कळ्या,

मुक्त उमलती !

सौन्दर्य खुलवी भाषा,

अलंकार शब्दातीत

अचंबित होई शब्द भाव,

कोदंणाने सुशोभित !

उलगडता शब्द उमगे,

लडीवाळ प्रितगीत

सुरेल होई गुफुंनी,

मनमंदिरातील भावगीत !

फुलवी अक्षरे शब्दांचे मळे,

मुग्ध प्रतिभेशी

शब्दगुजांनी नाते जुळे,

अलगद मनामनाशी !

अलवार मिटता शब्द,

सुमनांची ओजंळ

दडुन राही स्वप्न फुलांचा,

मंद परिमळ !!

 

सौ.स्मिता श्रीकांत रेखडे.

इन्द्रप्रस्थ नगर, नागपूर.

मो.न.9767104847

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =