You are currently viewing झरोका

झरोका

माझी लेखणी साहित्य समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी जगन्नाथ खराटे यांचा अप्रतिम समाजप्रबोधनपर लेख.

झरोका

कळंप…(झुंडी)

जगाचं ज्ञान व्हायला पाहिजे ह्या द्रुष्टीने जुन्या काळातली लोकं आपल्या पोरासोरांना म्हणायची “जरा लोकांत उठबस करायची मानसानं”, खरं म्हणजे लोकांत ऊठबस, म्हणजे” बाहेरच्या जगात वावरनं” असं त्यांचं मत होतं.अन ते थोडं बरोबरही होतं.. पन्,बाहेरचं जग बघायचं ठरवलं तर त्या वेळी ते जग बघनं अगदी अशक्य होतं,एवढं विशाल जग आहे हे.पुर्वीच्या काळात प्रवासाची तुटपुंजी साधनं होती. गरिबीमुळे अगदी नातलगाकडे जायचं म्हटलं तरी घाम फुटे.कारण पै, पैका लागंत असे..
पन्,काळ बदलला अन् थोडं का होईना पन पैपेका बर्याच पैकी आला,अन् त्यामुळे आज सध्याच्या संगणक युगात आपन बसल्या जागेवर जग पाहतो आहे, असा हा विज्ञानाने चमत्कार घडवला.
तर,आपन आता अगदी जुन्या वाड वडीलांच्या म्हणन्यानुसार मानसांत ऊठबस करु लागलो म्हणजे, बसल्या जागेवर टीव्हीवर सर्व जगाचं दर्शन घेवु लागलो…सहजपणे डिस्कवरी चॅनल लावलं तर..तिथे सर्वकाही निसर्गाच्या सान्निध्यातलं जग दिसु लागलं.अगदी प्राणी ,पशुपक्षी, वनचर,श्वापदं ह्यांचे कळंप किंवा झुंडीच्या झुंडी दिसु लागल्या.अन कळपातले अनेक प्राणी, श्वापदाचं ते जग,एकांच ध्येयाने झपाटलेले दिसलं.अन्, ते म्हणजे चरितार्थासाठी, किंबहुना अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची दयामाया न ठेवता निरपराध प्राण्यांचा फडशा पाडणं.गरीब,घाबरट, बेसावध अशा कळपातल्या जनावराला हेरुन, फाडुन खानं…पन् हा हल्ला हे सारं काही”कळपाबाहेरचीच श्वापदे” करु शकत असतात हा एक नियम आहे तिथला,…
खरंच ,किती विदारक होतं ते??…
अन् मनाशी विचार करु लागलो.खरंच आपन मानवसुद्धा ह्यापेक्षा वेगळं काय करतो?? अगदी साधर्म्य आहे त्यांच्यांत व आपल्यांत.आपनही आपल्याच कुटुंबाच्या कळपात राहतो.कळपं किंवा झुंडी ह्या अनेक प्रकारच्या आहेत ,कुटुबांचे, गावाचे, राज्याचे, देशांचे. वेगवेगळ्या जातीधर्माचे, उचनीचचे, गरिबश्रीमतांचे, पंथाचे,. हे सारेच एकप्रकारचे कळपंच आहे..ह्या कळपामधील‌ सर्वच जन एकांच ध्येयाने झपाटलेले असतात,अन,ते म्हणजे आपलं अस्तित्वासाठी,साम, दाम, दंड,भेद ह्या नितीनुसार कमजोर अशा निरपराधांचा फडशा पाडनं… खरंतर, जनावरांच्या कळपात मात्रं हे असं कधीच होत नाही.ते स्वकियावर कधीही हल्ला करित नाही…पन… मानवप्राणी ह्याला अपवाद आहे..खरं तर कळपात सामंजस्य हवं तर त्याला कळंप म्हणनं योग्य ठरतं..
पन् मानसाच़ तसं नाही.. खरं तर मानसाच्या ह्या कळपांना, झुडींच म्हणायला पाहिजे..झुंडी म्हणजे एक दिशाहिन आणि सारासार‌ विवेकहीन असा समुदाय…
कळपांत एकता,सामंजस्य,आदर, प्रेम ,मानुसकी आणि दयामाया हे भाव असतात..पन् मानसाच्या ह्या कळपांत किंबहूना झुंडीमध्ये ह्यापैकी कुठलाही गुण दिसतं नाही.‌अन जर असला तर, तो गुण अगदी स्वार्थानं बरबटलेला असतो..
आपल्या आजूबाजूला सद्ध्या हेंच दिसुन येत आहे..अगदी दिखावु, कामचलाऊ नेतृत्वाच्या नावावर दिशाहिन झुंडी दिसताहेत अवती भवती…अन् हृया झंडीमधले धुर्त, स्वार्थी,मतलबी,आपला फायदा घेऊन अलगद,नामानिराळे राहून बाजुला होताहेत..हे आपन सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे सगळं.खरंच हे समाजाचं एक विदारक वास्तव आहे.. अगदी शुल्लक गोष्टींवरून आगीची ठिणगी उडवून आगी लावून देतात काही कावेबाज, अन झुंडीच्या झुंडी पेटतात विद्वेषाने,अन्,सारेजण भाजुन निघतात आपआपसात.अन ह्या झुंडीत द्वेषाचा वनवा भडकतो नव्या जोमाने, अन,वनव्याच्या आगीवर पोळी भाजून खात आहे धुर्त,चानाक्ष मंडळी..
खरंच हे किती भयानक वास्तव पाहतो आहे आपन उघड्या डोळ्याने,.
कध कधी वाटतं हे असं व्हायला नको. अन् आपन हे सर्व थांबवलं पाहिजे.अन असंही वाटतं की आपन पुढाकार घेतला पाहिजे इथं.कारण आपनही ह्यांच कळपात राहतो..अन एके दिवशी विद्वेषाची आग आपल्या पर्यंत पोचायला वेळ लागनार नाही. हे तर अगदी खरंच आहे.पन ही आग विझवंनं एकट्या दुकट्याचं काम नाही. ह्या कळपात आपल्यासारखे ही सम विचारी असतीलच ना? त्यांना सोबत घेऊन आपन हा विद्वेषाचा वनवा प्रेम आपुलकी, सामंजस्याच्या पाण्यानं विझवला पाहिजे,कारण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एवढं साध सोप काम करायला हवं.शेवटी आपनही कळपातले आहोंत ना??

जगन्नाथ खराटे –ठाणे
दि-२१एप्रील२२

प्रतिक्रिया व्यक्त करा