You are currently viewing राजकीय वरदहस्तात बांदा येथे जाणाऱ्या घाटाखालील गावात पिलेवाडीत बसली जुगाराची मैफिल…जयगो, हेमलो मुख्य सूत्रधार

राजकीय वरदहस्तात बांदा येथे जाणाऱ्या घाटाखालील गावात पिलेवाडीत बसली जुगाराची मैफिल…जयगो, हेमलो मुख्य सूत्रधार

*आम्हाला एकच काम नाही*

 

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखा खेळ असेल तर तो जुगार…एखादा आपल्या घरातील सौभाग्याचे लेणे सुद्धा विकून जुगारासाठी वाट्टेल ते करून पैसे आणतो आणि जुगाराच्या नादा पोटी सर्वस्व गमावून बसतो, तक्षीम घेणारे आणि त्यांच्या कडून मलिंदा खाणारे खाकी वर्दी वाले, राजकीय पुढारी मात्र टाळूवरील लोणी खाऊन सुस्त होतात, परंतु गोरगरीब पैशांच्या आशेपोटी जुगाराचा बळी ठरतो.

सावंतवाडी बांदा मार्गावरील घाटाखालील गावातील पिलेवाडीत राजकीय वरदहस्त लाभलेली अशीच जुगाराची मैफिल असून शिरोड्याचा जयगो आणि नाटे येथील हेमलो यांनी या जुगाराच्या मैफिलीचे आयोजन केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्याचप्रमाणे गोवा येथील जुगारी खेळण्यासाठी उपस्थित आहेत.

पिलेवाडीत सुरू असणारा जुगार थांबविण्यासाठी जागृत निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले असता प्रश्नोत्तरा दाखल “आम्हाला एकच काम नाही” असे सांगत आपली भूमिका संशयित असल्याचाच दाखला दिला. राजकीय वरदहस्त लाभलेल्या पिलेवाडीतील मैफिलीत गावातील तरुणांचा देखील भरणा आहे, त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशाप्रकारे सुरू असलेल्या आणि तरुणांना देशोधडीला लावणाऱ्या जुगाराच्या मैफिलींची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =