You are currently viewing अंगणवाडी मदतनीस मानधन तत्वावर भरती

अंगणवाडी मदतनीस मानधन तत्वावर भरती

अंगणवाडी मदतनीस मानधन तत्वावर भरती

सिंधुदुर्गनगरी

महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग जि.रत्नागिरी  प्रकल्पांतील 38 रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची, मानधनी तत्वावर भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक महिला उमेदवारांनी  दि. 19 जुलै 2023  रोजी सायं.6.15 पर्यंत अर्ज कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन (नागरी) रत्नागिरी  सिंधुदुर्गचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.बी. काटकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, मावलवण- देऊळवाडा, रेवतळे जि.प. वेंगुर्ला- वेंगुर्ला शाळा नं-3. कणकवली – कणकवली शाळा नं5. कुडाळ – विठ्ठलवाडी, गणेश नगर, पडतेवाडी. दोडामार्ग- शाळा नं.1 देवगड- सडा, जामसंडे टापू, शांतीनगर, टिळक नगर, वडांबा, वेळवाडी, तुळशीनगर, कावळेवाडी, अशा 16 अंगणवाडीकरिता नागरी क्षेत्रातील महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्पाच्या नागरी क्षेत्राबाहेरील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील व त्याबाबत त्यांना कोणत्याही स्वरुपात लेखी कळविण्यात येणार नाही. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात शासकीय सुट्टी सोडून सादर करावेत.

आवश्यक पात्रता- वय 18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवार वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे) शिक्षण- किमान 12 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक, शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.

अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती बाबत http://sindhudurg.gov.in व http://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

000000

आयटीआय प्रवेशासाठी 11 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून पासून सुरु करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन प.संखे यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावूर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रीयेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय उभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्याचे प्रस्तावीत आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच  आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गाच्य उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

००००

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी 14 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) सेवा सोसायट्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी  झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दिनांक 14 जुलै 2023 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.

 बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्य उद्देशाने  रु. 3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: कौविउवि-2015 प्र. क्र.97 रोस्वरो-1 दि.11/12/2015 अन्वये जिल्हा स्तरावकाम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झालेली आहे.

आवश्यक अटी व शर्तीची पुर्तताकरणे अनिवार्य आहे. अशिरा प्राप्त झालेली तसेच अपुर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा