You are currently viewing पुण्यात शिक्षक पुरस्कार प्रदान 

पुण्यात शिक्षक पुरस्कार प्रदान 

पुणे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अलौकिक योगदानाचा गौरव करणारा ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ सोहळा निळू फुले नाट्यगृह, पुणे येथे अत्यंत उत्साहात व थाटात पार पडला. Swift N Lift कंपनीच्या वतीने आयोजित या गौरव पूर्ण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत तब्बल १४० गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

या भव्य सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध गझलकार, कवयित्री व साहित्यिका कविताजी काळे यांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षण व साहित्य विश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या कविताजी काळे यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

कार्यक्रमास Swift N Lift कंपनीचे CEO निलेशजी साबळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर यांचे १३ वे वंशज सोहेलजी शेख आणि येवले चहाचे CEO नवनाथजी येवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक गणेशजी मोढवे यांनी केले. राहुल खरात यांनी काव्यमय शुभेच्छा सादर केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा