You are currently viewing तम + आशा

तम + आशा

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा वाक्य प्रचार आहे . तम म्हणजे अंधार आणि त्यामधील आशा असा एकत्र करून त्या शब्दापासून मार्मिक असा शब्द तयार झाला तो म्हणजे “” तमाशा ” पूर्वी प्रत्येक खेडेगावात आपल्या श्रद्धेनुसार प्रत्येक देवांचे मंदिर होतें . साध सुध मंदिर असायचं. वर्षातून एक या देवाची यात्रा ग्रामस्थ आयोजित करत होते. गाव वाड्या वस्त्या लहान लहान असायची. गावात एकच मंदिर आणि गावाच्या मधोमध एक वडाच पिंपळाच भल मोठ झाड असायचं त्याला बांधिव कट्टा असायचा त्याला पार असं म्हणलं जातं होतं. गावांची यात्रा ग्रामस्थांच्या संगनमताने ठरविली जात होती. गावांच्या यात्रेत येणारी खाऊ विक्रेते. खेळणी विक्री करणारे. कपडे विक्री करणारे. गुलाल खोबर व हळद कुंकू यांची विक्री करणारे .मटन चिकन यांच काय नियोजन असे विविध लहान लहान विक्रेते येणारं त्यांना जागा कोठे द्यायची . कुस्तीसाठी जागा कोठे . यात्रेसाठी वर्गणी . असा सर्व बेत सर्वांच्या मताने करतो.
आत्ता सर्वात महत्वाचा विषय असतो तो गावाच्या आनबान शान याचा त्यासाठी उत्कृष्ट कला सादर करणारे . लोकांचे उत्कृष्ट मनोरंजन करणारे कलाकार. दिसायला सुंदर भिंगरी सारखी नाचणारी नृतकी .असा सर्व लवाजमा असणारा आणि गावा म्हणलं की दोन पार्ट्या याच मत असतं आपला तमाशा चांगला झाला पाहिजे. त्यांचं मत असतं त्याच्यापेक्षा आपला तमाशा चांगला झाला पाहिजे. आणि मग तमाशाचा फड ठरविला जातो . पूर्वी चार चाकी गाडी नव्हती त्यामुळे बैलगाडी मधून हे तमाशा कलावंत प्रवास करत असतं. जागोजागी मुक्काम ठोकत एकवेळ ज्या गावात तमाशा सादर करायचा आहे. ते गाव येत त्यावेळी कुठली थेअटर मग हा सर्व लवाजमा गावाच्या चावडीवर तमाशा सादर करायला येतात. तमाशातील वघा प्रमाणे कृष्ण गोपी . नाचा . राजा. प्रधान .गणपा . मावशी. ढोलकी वादक. तुणतुणे वादक. सुरपेटी. तबला. टाळ. गाण गाणारा गायक. असा सर्व आपापल्या पात्रानूसार वेशभूषा करतात . आणि आत्ता सर्वात महत्वाची लोकांना ओढ असते ती तमाशातील सुंदर सुबक बांधणी असणारी नृतकी तिच नटन वेगळंच असतं काटा पदाराची साडी. कंबरपट्टा . डोक्यात गजरा . आणि गळ्यात बोरमाळ. आणि पायात कमीत कमी दहा दहा किलोचे घुंगरु नव्हे तर चाळ आणि अशी सर्व नटापटा झाला की सर्व तमाशा कलावंत आपली कला सादर करायला तयार होतात .
गावातील सरपंच. नामांकित व्यक्ती यांच्या हस्ते तमाशा सुरू करण्यासाठी नारळ वाढवला जातो. आणि तमाशाला गण गौळणीने सुरवात होते. आणि लावणीचा ठेका धरून ढोलकीवाला वाजवायला सुरुवात करतो आणि फेटे. टोप्या. मुरमुरे. शिट्या . आणि आरोळ्यांनी सर्व गाव गुंजून जातो. आणि तमाशातील नृतकी जी कोणती लावणी गाणं नाचून विशिष्ट हावभाव करून दाखवत असतें. त्यामागे काहींनी काही जन प्रबोधन. समाजाच्या हितासाठी कडव आणि कडव तयार केलेलें असत . नृतकी नाचून बघून आपली कला सादर करताना आपली सुधभूत विसरलेली असतें. आणि तमाशा बघणारे कवकवीत डोळ. गिळांकृत करणार्या नजरा .कलेपेक्षा त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन निच वृत्तीचा असतो. पहिलं तमाशे भाकरीसाठी सुध्दा केलेलें मी ऐकलं आहे.कारण त्यावेळी पैसा प्रिय नव्हता तर समाजात प्रबोधन . करणारे चांगलं वाईट शिकविणारे माध्यम हे फक्त आणि फक्त तमाशाच होता . तमाशा संपतो आणि सर्व गाव आपापल्या घरला जात तमाशातील कलाकार आपला वेश बदलून प्रत्येकाला वाटून दिलेले कामे करायला लागतात. कोण जेवन करत. कोण जेवणाची भांडी धुत. कोण जेवन करणारे यांना मदत करते. काहीजण सामान आवरा आवरी करतात. म्हणजे आपणांस एक आपलं चार माणसाच कुटुंब संभाळणे होत नाही आणि हे तमाशातील कलाकार पन्नास माणसं बैल यांचा कसा संभाळ करत असतील तमाशा सुपारी जेमतेम असायची. कसा काय संभाळ करत असतील विचार करण्यासारखं आहे.
तमाशातील नाचणारी नार म्हणत असतें . “” पोटासाठी नाचते मी परवा कुणाची “” बाई कुंपण घालून घ्या की आंब आल तयारीला “” संभाळ फड तुरयाला आला तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा “” ग बाई मला इशकाची इंगळी ढसली “” तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका जाऊ सोडून रंग महाल . शालु बुटेदार . घुंगरू घुंगरू . डोळ्यांच्या पापण्या मधून नोट उचलणं . ओठाने नोट घेणं . असं म्हणत नाचत असतें. पोटासाठी नाचणारे आपली कला सादर करणारे या़चयाशी सन्मानाने वागा. कोणालाही त्यास अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू नका . आंब्याचा सिझन सुरू झाला की खेडेगावात आंबा चोरीला जाण हे घडतच असत त्यामुळे त्यांची राखणं करणयाचा सल्ला या गाण्यातून दिला जातो. ऊसाला कोल्हे यांच्यामुळे बरेचं नुकसान होतें त्यामुळे त्यांची राखणं करा . गावावर चोराच संकट गावांत शिक्षणाचं महत्त्व. पण या सर्वांचा नेमका उलटा अर्थ लावतो आणि कलेचा आणि कलाकारांचा अपमान करतो . म्हणजे कला आणि कलाकार आज अडचणीत सापडले आहेत
सुरुवातीचा तमाशा हा नाटकाचा एक प्रकार आहे . याची सुरुवात महाराष्ट्रात १६व्या शतकात झाली. ही लोककला इथल्या इतर कलांपेक्षा थोडी वेगळी आहे. ‘तमाशा’ या शब्दाचा अर्थ ‘मनोरंजन’ असा होतो. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की त्याची उत्पत्ती संस्कृत नाटक प्रकार – प्रहसन आणि भान पासून झाली आहे. महाभारत आणि रामायण यांसारख्या पौराणिक कथा या लोककलांमधून कथन केल्या जातात. यामध्ये ढोलकी , ढोलकी, तुणतुणी, मंजिरा , डफ , हलगी , कडा , हार्मोनियम आणि घुंगरू यांचा वापर केला जातो.
कार्यक्रमाचे आयोजन प्रामुख्याने महाराष्ट्रातील ‘कोल्हाटी’ समाजाकडून केले जाते. ही कला सादर करण्यासाठी कोणत्याही स्टेजची गरज नाही. हे कोणत्याही मोकळ्या जागेत केले जाऊ शकते.
कृष्ण कथा तमाशा सुरू होताच प्रथम गणपतीची पूजा केली जाते. यानंतर, गलवाना किंवा गोलनियर गायले जाते. मराठी साहित्यात, कृष्ण लीलेची ही रूपे आहेत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या विविध घटनांचे चित्रण केले आहे.
तमाशा नाट्याचे भाग तमाशाचे चार भाग किंवा चार संख्येत प्रतिनिधित्व करतात, ते अनुक्रमे गण, गवळण, बटौनी आणि शेवटी मुख्य नाट्य वघा आहेत
आज सर्वत्र मनोरंजन सुधारणा झाली आणि करमणूक करण्यासाठी रेडिओ. टिव्ही. असं ब-याच सामान आलं आणि कलाकार यांना उपाशीपोटी झोपण्याची सवय लावणयास सुरुवात झाली . अजून आमूलाग्र बदल झाला तो म्हणजे तमाशाचे उघड्यावर होणारे खेळ कणातीचया आत गेले. जलसा थिएटर मध्ये तमाशे होण्यास सुरुवात झाली पण जी कलेची किंमत पैशाने घेतली आणि शरिर व्यवहार सुरू झाला ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज डाॅलबी. होमथिएटर . यामुळे यात्रा जत्रा रंगणयास सुरुवात झाली . त्यामुळे कलेची पूजा करणारे कलाकार यांचें तमाशाचे फड बंद पडायला लागले. कलाकार तमाशाचे काम सोडून शहराकडे कामाच्या शोधात जाऊ लागले .
शासनाला या विविध कलाकारांची किव आली आणि शासनाने कलाकार मंडळांची स्थापना केली . यामध्ये ५० वर्षांपासून पुढे कलाकारांना कोणापुढे हात पसरावे लागू नये यासाठी पेन्शन तसेच विविध योजना सुरू केल्या आणि खरोखरच कलाकारांना न्याय मिळाला असं वाटलं पण त्यातसुद्धा मोठा साप शासनाने सोडला तो म्हणजे तुम्ही कोणते कार्यक्रम केलें त्यातील लोकांच्या हितांचे किती. त्यांचे फोटो कलाकार मानधन मिळविण्यासाठी द्यावे लागत आहेत. म्हणजे मला एक सांगा पन्नास वर्षांपाठिमागे फोटोंची सोय होती कां? त्यावेळी कागदपत्रांची किंमत लोकांना होती कां ? पैसा नाही समाजसेवेसाठी आपली कला वाटणारे आज रस्त्यावर एक एक रूपयाला महाग झाले आहेत.मुल बाळ सांभाळत नाहीत. घरांत किंमत नाही. बायको व्यवस्थित बोलतं नाही. म्हणून व्यसनाधीन गेलेलं गटारात रस्त्यावर पडलेले फाटके कपडे. अशी दैना उसळली आहे .
आजही कलाकार असतील तर त्यांचे मन दुखविणे हा आमचा उद्देश नाही. पण आपल्या गावात पोटासाठी येणारे कलाकार यांचा अपमान अवमान करु नका. शासनाने ठराविक अटि शर्ती वर्ग करुन कलाकारांच्या हक्काचे मानधन मिळवून द्यावे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा