You are currently viewing कधी कधी मनामधे

कधी कधी मनामधे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लघुलेख*

 

*कधी कधी मनामधे*

*लघुलेख*

 

 

मन…मन असं अनावर असतं ना…वा-याच्या वेगाने धावणारं..

आभाळात मनमुक्त विहरणारं..

तर कधी खोल खोल डोहात आत्मभान जागवायला बुडी घेणारं…

मन स्वप्नात रमणारं..वास्तवाला सामोरं जाताना दचकणारंही…

मन कधी निश्चयी तर कधी कणखर..प्रसंगानुरूप आपलं मन सतत बदलत असतं….

मन मायेचा पाझर होतं आणि वात्सल्यात चिंब भिजवतं …आई होऊन तर कधी पोटात जिव्हाळा असूनही कर्तव्यकठोर बाप होऊन…

मन ..एक हळवी भावना ,संवेदना घेऊन अधीर प्रेयसी तर कधी वेड्यागत तिची वाट ठरल्यावेळी ठरल्या जागी बघणारा वेडा प्रियकर…

मन तप्त सूर्य ही बनतं,सकाळचं कोवळं ऊन तर दुपारचं भाजून काढणारं ऊन आणि हळू हळू सांजावतं …तसं मनही हळूवार आणि शांत होत जातं ,आपोआप.कुठलंच उरत नाही किल्मिष मग.सर्व सर्व विसरून डोंगराआड जाणा-या शांत क्लांत दिनमणीसारखंच होतं …मनही.

कधी अवखळ अल्लड कधी,संथ शांत कधी धडपडं तर कधी शहाणं शहाणं…

हो! मनच असतं ना ,जे बुध्दीशी व्यवस्थित सांगड घालतं.बुध्दी त्याला आंजारून गोंजारून

ताळ्यावर आणते.म्हणून मन समजूतदारही….

यासाठी *कधी कधी मनामधे*

येणा-या गोष्टींचं ऐकावंही….

फिरावं,गावं,लिहावं…आवडेल ते रुचेल ते….

आणि मनाला सदाच प्रफुल्लित ठेवावं.कारण *जीवन सुंदर आहे*.🙏

 

*अरुणा दुद्दलवार@✍️*

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 4 =