You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीनंतर बंद झालेले बांदा परिसरातील जुगार महिनाभरानंतर पुन्हा सुरू

संवाद मीडियाच्या बातमीनंतर बंद झालेले बांदा परिसरातील जुगार महिनाभरानंतर पुन्हा सुरू

पेट्रोलिंगसाठी जाणारे पोलिस संशोधनाचा विषय

सावंतवाडी तालुक्यातील बांदा पंचक्रोशी मध्ये बांदा पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने आणि दशावतारी नाटके यांच्याआडून जुगाराच्या मैफीली बसत आहेत. बांदा पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे जुगाऱ्याकडून गावागावांमध्ये दशावतारी नाटके यांचे आयोजन केले जाते. या दशावतारी नाटकांच्या आयोजनासाठी जास्त पैशांची गरज नसते, त्यामुळे जुगाराची तक्षिम घेणारे गावांमध्ये भरवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी पाच दहा हजार रुपये खर्च करतात. क्रिकेट सामने किंवा नाटके ज्या ठिकाणी भरवली जातात तिथेच क्रिकेट सामन्यांच्या, नाटकांच्या आडून मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या बैठकी बसवल्या जातात. त्यातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. परंतु या कमाईपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे क्रिकेट सामने खेळण्यासाठी गावात येणारे तरुण खेळाडू यांना देखील या जुगाराची लत लागते. त्यामुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत आहे.
संवाद मीडियाच्या बातमीनंतर बांदा पंचक्रोशीतील क्रिकेट सामने आणि नाटकांच्या आडून सुरू असणारे जुगार बंद होते. परंतु गेला महिनाभर बंद असलेले जुगाराचे अड्डे पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आलेले असून गावागावांमध्ये क्रिकेट सामने भरवले जात आहेत. सह्याद्री पट्ट्यातील गावांची अर्थव्यवस्था येथील आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा सुरू असते, त्यामुळे तरुणांच्या, गावकऱ्यांच्या हातात पैसा येत आहे. वर्षातून एकदा मिळणारे उत्पन्न गावकरी, तरुण मुले जुगाराच्या नादापाई वाया घालवत आहेत. त्यामुळे जुगाराचा धंदा सर्वात जास्त तेजीत सुरू आहे. बांदा पंचक्रोशीतील एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने याबाबत भाष्य करताना पेट्रोलिंग साठी जाणारे पोलीस यावर कारवाई करताना दिसत नसून, पेट्रोलिंग करणारे पोलीस म्हणजेच संशोधनाचा विषय झाला आहे असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. असे त्यांनी संवाद मीडियाकडे बोलताना सांगितले.
बांदा पंचक्रोशी मध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यातील या गावा मध्ये एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर बागायती उत्पन्न मिळते, त्यामुळे काही गावातील लोक व तरुण वर्ग कष्टाचा मिळणारे उत्पन्न जुगारात घालवतात व जुगाराचा नाद अंगी लावून घेत आयुष्याची वाट लावतात. जिल्हाप्रमुख पोलीस प्रमुखांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 6 =