You are currently viewing 8 मे रोजी गाबीत समाज वधुवरांसाठी कणकवलीत मेळावा..

8 मे रोजी गाबीत समाज वधुवरांसाठी कणकवलीत मेळावा..

 

कणकवली :

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, मुंबई व गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 में 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेमध्ये “सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल’ 3 रा मजला- कणकवली एस टी स्टैण्ड समोर येथे “गाबीत समाजातील” वधु-वर, घटस्फोटित, विधवा, अपंग अशा समाजातील सर्व घटकांसाठी वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला असून याचा लाभ गाबीत समाज बांधवानी घ्यावा असे आवाहन गाबीत समाजाचे राष्ट्रीय संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.

सदरील मेळावा मालवणमध्ये घेण्यात येणार होता. परंतु कांही अपरिहार्य कारणांमुळे तो कणकवली येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री.परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष श्री.दिगंबर गांवकर, सरचिटणीस श्री. वासुदेव मोंडकर, तसेच गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण ताम्हणकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सदरील मेळाव्यामध्ये गाबीत समाजातील मुंबई व ईतर ठिकाणी वधुवर सूचक मंडळे चालविणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधिंना सुद्धा सहभागी करून घेतले जाणार आहे.

सदरील मेळाव्याचे वेळी वधु/वरांसाठी नोंदणी फी रुपये 200/-ठेवण्यात आलेली असून मेळाव्यासाठी वधु अथवा वर व एका पालकाने उपस्थित रहावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी येथील तालुका प्रतिनिधिकडे लवकरच नोंदणी फॉर्म उपलबद्ध करण्यात येतील.

गाबीत समाजातील विशेषत: किनारपट्टीतील वरांची वयोमर्यादा 35 ते 40 पर्यंत पोहोचली असून शिक्षण घेतलेल्या मूली व पालक यांच्या अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जुळविणयात अडचणी येत आहेत.

समाजातील विवाहाच्या सामाजिक समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त मुलामुलीनी नोंदणी करावी यासाठी पालकांनी स्वेछेने पुढाकार घ्यावा असे आवाहनही संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =