You are currently viewing

वेंगुर्ले नगरपरीषदेचा भव्य नगराध्यक्ष चषक क्रिडा सप्ताह 17 ते 21 नोव्हेंबरला

सात क्रिडा प्रकारांचा समावेश; स्वच्छतेचा प्रसारासाठी क्रिडा स्पर्धाचे आयोजन

वेंगुर्ले

स्वच्छतेचा संदेश घरोघरी प्रत्येक नागरीकांपर्यत पोहचावा तसेच शहरातील नागरीकांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांमध्ये स्वच्छतेचा प्रसार होण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरीषदेमार्फत नगराध्यक्ष चषक स्वच्छता क्रिडा सप्ताहाचे आयोजन दि. 17 ते 21 नोव्हेंबर कालावधीत करण्यांत आले आहे.

या क्रिडा सप्ताहात नेमबाजी, बुध्दीबळ, कॅरम, बँडमिंटन, जलतरण, टेबलटेनिस, व अँथलेटीक्स-रनिंग (धावणे) अशा 7 क्रिडा प्रकारांचा समावेश आहे. असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परीषदेत दिली. वेंगुर्ला नगरपरीषद घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेमध्ये भरीव कामगिरी करत आहे. नगरपरीषदेने केलेल्या कामांची दखल घेऊन शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून राज्य व देश पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या नगरपरीषदेने स्वच्छतेचे काम जसे केले व सातत्य राखले, तसे काम करण्याची सवय हि स्थानिक नागरीकांबरोबरच जिल्ह्यातील नागरीकांना लागावी. या उद्देशाने हा क्रिडा सप्ताह आयोजीत करण्यांत आला आहे.

बुधवार दि. 17 नोव्हेबर रोजी नेमबाजी स्पर्धा हि वेंगुर्ला नगरपरीषदेच्या एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र कॅम्प येथे होणार आहे. या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलगे, 14 वर्षाखालील मुली, 21 वर्षखालील मुलगे, 21 वर्षाखालील मुली, 21 वर्षावरील मुलगे व 21 वर्षावरील मुली अशा 6 गटांत होणार आहे. हि स्पर्धा ओपन साईट, पीप साईट व पिस्टल अशा 3 प्रकारांत होणार आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी कांचन उपरकर-9527417680 व सचिन काकड-8080890108 यांचेकडे सपंर्क साधावा.

शुक्रवार दि. 19 नोव्हेबरपासून सुरवात बुध्दीबळ स्पर्धा खुल्या गटासाठी वेंगुर्ला नगरपरीषदेच्या प्रशासकिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वामी विवेकानंद सभागृहात रॅपिड बुध्दीबळ या प्रकारात होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी प्रदिप प्रभू-9422101112 व अभिषेक नेमाणे – 9527454563 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे. शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी कॅरम स्पर्धा खुल्या गटासाठी वेंगुर्ला नगरपरीषदेच्या प्रशासकिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वामी विवेकानंद सभागृहात एकेरी (सिंगल्स) या प्रकारात होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी योगेश फणसळकर-7620755766 व रविराज खतकर – 9130386767 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबरपासून बँडमिंटन स्पर्धा सुरु होईल. यात 14 वर्षाखालील मुलगे, 14 वर्षाखालील मुली, 19 वर्षखालील मुलगे, 19 वर्षाखालील मुली या गटासाठी एकेरी (सिंगल्स), खुल्या गट मुलगे व मुलींंसाठी एकेरी (सिंगल्स) व दुहेरी (डबल्स) तर 40 वर्षाखावरील पुरूष गटासाठी दुहेरी (डबल्स) अशा गटांत वेंगुर्ला नगरपरीषदेच्या कॅम्प येथील क्रिडांगणावर होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी अनमोल गिरप-9768728007 व वैभव म्हाकवेकर – 9561956334 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी जलतरण स्पर्धा 10 वर्षाखालील मुलगे, 10 वर्षाखालील मुली, 14 वर्षाखालील मुलगे, 14 वर्षाखालील मुली, 18 वर्षखालील मुलगे, 18 वर्षाखालील मुली, खुल्या गट मुलगे व मुली तर 60 वर्षाखावरील पुरूष गटासाठी फ्रि-स्टाईल प्रकारात वेंगुर्ला नगरपरीषदेच्या कॅम्प येथील सिंधुसागर जलतरण तलाव येथे होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी दिपक सावंत – 7249202691 व आनंद परब-9834766924 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबरपासूनपुढे टेबलटेनिस स्पर्धा खुल्या गट मुलगे व मुलांसाठी एकेरी (सिंगल्स) व दुहेरी (डबल्स) अशा क्रिडाप्रकारात वेंगुर्ला नगरपरीषदेच्या कॅम्प येथील क्रिडांगणावर होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी अब्दुल शेख-9404941336 व सागर चौधरी-9175799969 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी अँथलेटीक्स (रनिंग) धावणे स्पर्धा 16 वर्षाखालील मुलगे, 16 वर्षाखालील मुलीसाठी 100 व 400 मीटर धावणे प्रकारात तर 16 वर्षखालील मुलगे, 16 वर्षाखालील मुली या गटासाठी 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर धावणे प्रकारात वेंगुर्ला नगरपरीषदेच्या कॅम्प येथील क्रिडांगणावर होणार आहे. या खेळाच्या नोंदणीसाठी जयराम वायंगणकर-9423301354 व मंदार चौकेकर-7058486559 यांचेकडे नांव नोंदणी करावयाची आहे.

या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक/मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या मागील दिड-दोन वर्षाच्या कालखंडापासून बाहेर येत असताना बंद झाालेली क्रिडा चळवळ पुन्हा सुरू करणे या उद्देशाने हा क्रिडा सप्ताह आयोजित करण्यांत आल्याने ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सदृढ वेंगुर्ला’ या ब्रीद वाक्याला समोर ठेवून जिल्ह्यातील बहुसंख्य क्रिडा स्पर्धकांनी या क्रिडा स्पर्धामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा