You are currently viewing मोती तलावात आत्महत्या

मोती तलावात आत्महत्या

सावंतवाडी (खरवतकर टेंब) येथील जोसेफ लॉरेन्स फर्नांडिस (६७) यांनी येथील मोती तलावात आत्महत्या केली.
जोसेफ हे पहाटे पाच वाजता दुचाकीवरून राहत्या घरातून निघाले. दुचाकी राजवाड्यासमोरील रस्त्यालगत उभी करून त्यांनी मोती तलावात उडी घेतली. दुचाकी आणि काठावरील त्यांचे चप्पल यावरून जोसेफ फर्नांडिस हेच असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगेली येथील बाबल आल्मेडा यांची टीम दाखल होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा