You are currently viewing शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन

स्पर्धेत प्रियांका लाड विजेत्या तर वैदेही जाधव उपविजेत्या

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने महिलांची जिल्हास्तरीय नारळ लढवणे स्पर्धा भरड दत्तमंदिर येथे काल मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ योग साधका जयश्री हडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. वृंदा मोरे व स्मृती कांदळगावकर यांच्या हस्ते शुभारंभाचा नारळ लढवून स्पर्धेची सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेला हजारोंच्या संख्येने स्पर्धक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रियांका लाड या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्यांना अस्सल सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याची तीन नाणी, पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, उपविजेत्या वैदेही जाधव यांना सोन्याची नथ व सोन्याचे नाणे तर मनीषा जाधव व भारती आचरेकर यांना चांदीचा दिवा देऊन उत्तेजनार्थ म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्वेता शेखर तोडणकर या लकी ड्रॉ च्या मानकरी ठरल्या.
*आमदार वैभव नाईक म्हणाले,* शिल्पा खोत व यतीन खोत यांच्यासारखी सतत जनतेत राहून काम करणारी ही माणसे खऱ्या अर्थाने जनसेवा करत आहेत. महिलांसाठी नारळ लढवणे ही स्पर्धा आज सर्वत्र खेळवली जाते. मात्र आठ वर्षांपूर्वी या स्पर्धेची मालवणात मुहूर्तमेढ रोवून या स्पर्धेच्या माध्यमातून शिल्पा खोत यांनी महिलांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. महिलांचे स्वराज्य ढोल पथकही शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून उभे झाले. आज जिल्ह्यातच नव्हे तर जिल्हा बाहेरही या ढोल पथकाचा नावलौकिक आहे. यासह रक्तदान सेवेच्या माध्यमातून शिल्पा खोत सतत कार्यरत असतात. सामाजिक सेवेची मोठी आवड असलेले हे शिल्पा खोत व यतीन खोत हे दाम्पत्य आहे. असे कौतुकोद्गार आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.
नागरिक महिला या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी ठरते. ही स्पर्धा मालवण वासीयांना आपली वाटते त्यामुळेच स्पर्धेला सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो. हेच या स्पर्धेचे यश आहे. असे शिल्पा खोत यांनी स्पष्ट करत सर्वांचे आभार मानले. मालवणी सूत्रसंचालक बादल चौधरी यांच्या दमदार समालोचनाने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, बाबी जोगी, मंदार ओरसकर, महेश जावकर, नितीन वाळके, किरण वाळके, जेष्ठ नागरिक देवदत्त हडकर, जेष्ठ नागरिक पद्मजा वझे आई, परशुराम खोत, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे,भाई कासवकर, नरेश हुले, सिद्धू जाधव, मनोज मोंडकर, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, प्रकाश करंगुटकर, प्रसाद आडवणकर, बंड्या सरमळकर, सेजल परब, शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, दीपा शिंदे, नंदा सारंग, चारुशीला आढाव, स्मृती कांदळगावकर, वृंदा मोरे, रूपा कुडाळकर, माजी सभापती सोनाली कोदे, महानंदा खानोलकर, माई चिंदरकर, लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, पूजा वेरलकर, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, कृपा कोरगावकर, प्राजक्ता गांगनाईक, पूजा तळाशीलकर,अक्षय भोसले आदींसह विविध मान्यवर,स्वराज्य ढोल पथक सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =