भाली लावुनी केसरी गंध टिळा,
तुळशीची माळ घालुनी गळा,
हाती घेवुन भगवी पताका,
चाले वारकरी फुलवित पंढरीचा मळा ||१||
टाळ, मृदुंग, वीणा बोले,
अखंड हरिनामाच्या गजरात,
नाचे वारकरी पंढरीचा,
विठुरायाच्या अंगणात ||२||
बोले रामकृष्ण हरी,
नाचे पंढरीची वारी,
टाळ, मृदुंगाच्या गजरात,
अवघी दुमदुमली पंढरी ||३||
दिसे वारीत समभाव,
नाही तिथं भेदाभेद,
वारी आषाढी, कार्तिकीची,
मना लावि रे पंढरीचे वेध ||४||
मराठी संस्कृतीचं वैभव,
युगानुयुगे घेवुनी मिरविते,
वारी परंपरा पंढरीची,
ज्ञान संतांचं अखंड गिरविते ||५||
रचनाकार – कवी प्रविण खोलंबे.
संपर्क क्रमांक – ८३२९१६४९६१.