You are currently viewing बना खलाशी …

बना खलाशी …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बना खलाशी …*

या झोपडीत माझ्या सारी सुखे हाताशी
सहमत सारे व्हाल तुम्ही माझ्या मताशी..

उठताच मोबाईल घेते पहा हातात
समुहावरी त्या गोष्टी काय चालतात
होते अधिर इतकी नुरते न भान कसले
शेजारी माझ्या कोण? कोणी न कधी दिसले
जातो किती तो काळ ते कळत नाही मजशी
सहमत सारे व्हाल तुम्ही माझ्या मताशी..

आवरून कसे बसे घेते पुन्हा हातात
साऱ्याच ग्रूपवर बाता त्या चालतात
मारून डिलिट सारे करतेच क्लिनचॅट
खाणाखुणा जराश्या करते त्या पटापट
रूसवा नको कुणाचा मज वाचले न कोणी
कधी अंगठा नि दिल डोळ्यात देते पाणी
“कुणी एक सापडतो असतो खरा खलाशी”
सहमत सारे व्हाल तुम्ही माझ्या मताशी…

मोती हो फार थोडे,चमकून जाई हिरा
जुळतो हो भावबंध त्याशीच मग गहिरा
आपसुक बोट चाले अभिप्राय जाई लिहिला
चुरमुरे जाती उडून नहले पे राही देहला
बुडूनी त्या सागरात मिळतात खोल, मोती
वरवर पोहतात सारीच होई माती
काठावरी नका हो जावे जरा तळाशी
सहमत सारे व्हाल तुम्ही माझ्या मताशी….

“हे तप फार मोठे लावा मती पणाला”
मग येई पहा भरती उत्स्फुर्त सागराला
मोती नि पोवळे ते ओंजळ भरून जाते
दिनरात कष्टूनच फिरवावे लागे “जाते”
तप ज्याचे जितके खोल जो कष्टला हो फार
आपसूक पडतोच गळी कमलपुष्प हार
“हे दैवजात देणे पण झुंजणे मतीशी”
सहमत सारे व्हाल तुम्ही माझ्या मताशी…

प्रा.सौ.सुमती पवार UK
(9763605642)
दि: ३ नोव्हेंबर २०२३
वेळ: रात्री ११/२२

*संवाद मीडिया*

🏮🪔🎉🎊🪔🏮🪔🎉🎊🪔🏮

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + four =