You are currently viewing मामाचं गावं

मामाचं गावं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मामाचं गावं* 🌹

गड्या चिरेबंदी वाडा
माझ्या मामाचा देखणा
मजा सुट्टीची घालावी
मी रे मामाचा पाहुणा

जाता मामाच्या गावात
होती सवंगडी गोळा
राती होई पारावर
गाणं गायनाचा मेळा

चिरेबंदी वाड्यावर
खेळ सवंगड्याचा चाले
चांदण्या रात्रीची मजा
पाहुन चांदोबा पळे

मामाच्या मळ्यात रोज
आमराईत थांबू थोडं
पिकल्या पाडाचा आंबा
रस त्याचा लई गोड

मामाच्या मळ्यात वाहे
झुळुझुळु पाट पाणी
बारे देता देता गाती
आजोबा अभंग वाणी

नदीवर जाती सारे
पोहण्यांचा त्यासी छंद
गार गार पाण्यामध्ये
घेती सगळे आनंद

मामीच्या हातची खावी
चवदार ताक कढी
चव तिची घेता घेता
घडली आमची पिढी

गोष्ट आजीची ऐकता
निज मांडीवर येई
आजीच्या पदराची सर
कशालाच येतं नाही

*शीला पाटील. चांदवड.*

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा