You are currently viewing प्रीतीचा वसंत

प्रीतीचा वसंत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अप्रतिम काव्यरचना

फुलू दे सखी अपुल्या अता
प्रीतीचा वसंत
का उगा मनी तुझ्या
शिशिराची खंत

विरहाचा वैशाख वणवा
चोरट्या नजरेचा गारवा
आठवणींच्या सरीवर सरी
कोसळती मनात

धुंद जाहला आसमंत
शरदाच्या चांदण्यात
शीतल वारा स्पर्शुन जाई
मधूर मिलनात

चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे ,पुणे©️

प्रतिक्रिया व्यक्त करा