You are currently viewing कणकवली तालुक्यातील प्रलंबित देदोनेवाडी प्रकल्पांतील कामांना निधी प्राप्त, विकास कामांची सुरुवात, प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रयत्नांना यश —— अमित सामंत जिल्हाध्यक्ष

कणकवली तालुक्यातील प्रलंबित देदोनेवाडी प्रकल्पांतील कामांना निधी प्राप्त, विकास कामांची सुरुवात, प्रफुल्ल सुद्रीक यांच्या प्रयत्नांना यश —— अमित सामंत जिल्हाध्यक्ष

कणकवली :

तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील पाटबंधारे प्रकल्पाची कामे निधी अभावी बरीच वर्षे रखडलेली होती. त्यात ओसरगाव कळसुली रस्त्याचाही समावेश होता. देदोनेवाडी प्रकल्पांतर्गत अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन या भागातील अनेक वर्षे निधी अभावी प्रलंबित असलेल्या कामांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी व निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. त्यानुसार अनेक वर्षे निधी अभावी प्रलंबित असलेल्या देदोनेवाडी प्रकल्पांतील कामांना तातडीने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. तसे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला तात्काळ दिले. असून या भागातील कामांना लवकरात लवकर सुरूवात करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेे. त्यानुसार ओसरगाव कळसुली रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव श्री काका कुडाळकर, सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी बोलताना अमित सामंत यांनी सांगितलेे की, देदोनेवाडी पाटबंधारे प्रकल्प हा अनेक वर्षे निधी अभावी खोळबलेला होता.

त्यामुळे या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांना हरप्रकारे त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन या गावचे रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात १६ जानेवारी २०२२ रोजी भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती देऊन प्रलंबित प्रकल्प सुप्रमा मुळे रखडलेला आहे. त्याला मान्यता दिल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल व येथील प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळेल, असे स्पष्ट केले. यावेळी अर्थ मंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणातील प्रलंबित असलेल्या कामांना दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशाने सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. याचे सर्व श्रेय प्रफुल्ल सुद्रीक यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. आता यापुढे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गावचा विकास होण्यासाठी धडाडीचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय संबंध असलेले आपल्याच गावचे रहिवासी प्रफुल्ल सुद्रीक यांच्या पाठीशी राहून आपल्या गावचा सर्वांगीण विकास करून घ्या असे सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, भास्कर परब, बाळासाहेब कनयाळकर, सरपंच साक्षी परब, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगांवकर, कृष्णा घाडीगांवकर, तातोबा घाडीगांवकर, संतोष मुरकर, तंटामुक्त समिती सदस्य चंदू परब, प्रगती भोगले, चंद्रशेखर चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा