You are currently viewing नाहक फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी कोरोना रुग्णांच्या “हातावर शाई”…

नाहक फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी कोरोना रुग्णांच्या “हातावर शाई”…

पालकमंत्र्यांच्या सूचना; संसर्ग टाळण्यासाठी लाॅकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन….

सावंतवाडी

होम काॅरन्टाईन असलेले कोरोना रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये, यासाठी अशा रुग्णांच्या हातावर पेनाची शाई लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

दरम्यान रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, त्यासाठी नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन श्री सामंत यांनी केले. काल श्री. सामंत यांनी तहसीलदार कार्यालयाला भेट देत आढावा बैठक घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + twenty =