You are currently viewing गाणं व त्याच्या व्याकरणा बद्दलचे ढोबळ विचार

गाणं व त्याच्या व्याकरणा बद्दलचे ढोबळ विचार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुण कोर्डे लिखित अप्रतिम लेख*

 

*गाणं व त्याच्या व्याकरणा बद्दलचे ढोबळ विचार*

 

गाण्यासाठी योग्य आवाज निर्माण करता येतो,तो एका विशिष्ट प्रकारे गायन शिकल्यावर.परंतू मूळच्या आवाजातच जर गोडवा असेल तर सुरेल गाणं, आधीपासून आपोआपच यायला लागतं. अशा वेळी तुम्ही प्रथम गायला लागता. नंतर गायनाचे व्याकरण समजून घेणं हे आवश्यक असलं तरी गौण ठरतं. त्यावर सहजासहजी ताबा मिळवता येतो.जसं की आपण आपली मातृभाषा प्रथम बोलायला शिकतो व नंतर अर्थ लक्षात घेऊन व्याकरण शिकतो.बोलताना व्याकरणाचा विचार करून आपण बोलत नाही, तरीही सहज व अर्थपूर्ण बोलणं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर, ऋषीमुनींचं देता येईल. त्यांना ज्ञानप्राप्ती एवढी झाली होती की, त्यांची ” वाचम् अर्थोनुधावती ” अशी अवस्था झाली होती.म्हणजे त्यांना अर्थ लक्षात घेऊन बोलावे लागत नसे. तर त्यांच्या शब्दांमागून अर्थ धावत येत असे.अगदी तशीच अवस्था आपली मातृभाषेत बोलताना होते.

 

त्यामुळे घराणेशाहीतील गाणं शिकणं हे इतरांना (म्हणजे जे गाण्याचे व्याकरण शिकून जे गाणं शिकतात) कठीण व किचकट असलं तरी मूळचा सुरेल आवाज लाभलेल्यांना सहज प्राविण्य मिळवत शिकता येतं. कोणत्याही कलेच्या मर्यादा,तिची व्याप्ती आणि आपल्या क्षमतेला वेगळा वाव मिळायला, अर्थातच तिचं व्याकरण शिकावं लागतं.घराणेशाहीतील गायनाचे कुंपण अशा गायकाला टोचत नाही व तो त्यापासून जखमी होत नाही. मला वाटतं घराणेशाहीची बंधनं ज्यांना आवाज निर्माण करावा लागतो त्यांच्यासाठी असतात.मग ते गाणं सोडतात तरी,नाहीतर जिद्दीने पुढे जाऊन आपलं धेय्य गाठतात तरी. अशा रितीने धेय्य गाठणाऱ्यांमधे थोडा तुसडेपणा निर्माण होऊ शकतो.मला तर असंही वाटतं की नवीन गायकाने बहकून जाऊन एखाद्या गायनाची पद्धत मोडू नये म्हणून अशी बंधनं असतात.

 

म्हणून तर परिपक्व झालेलं फळ जसं स्वादिष्ट व मधूर लागतं तसं वरील दोन्ही प्रकारात होतं असावं. म्हणून तर गाण्याच्या व्याकरणाची गरज असते.म्हणजे फळ अतिपक्व नाही किंवा अर्धपक्व पण होत नाही.

 

अरूण कोर्डे

 

©®

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा