You are currently viewing सावंतवाडी-भटवाडी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी-भटवाडी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी:

भटवाडी येथील एका ४६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. संतोष गुरुनाथ दळवी असे त्यांचे नाव आहे. दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांच्या आईने येथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत दळवी हे दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास घराच्या मागे असलेल्या पडवीत गेले. व पडवीत असलेल्या लोखंडी बारला त्यांनी गळफास बांधून आत्महत्या केली. हा प्रकार प्रथम दर्शन त्यांच्या आईच्या निदर्शनास आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार अधिक तपासासाठी सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र दळवी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा