You are currently viewing जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद

जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद

–  जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी 

शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड १९) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍यात साथ रोग प्रतिबंध कायदा, १८९७, दिनांक १३/०३/२०२० पासून लागू करुन खंड २, ३, ४ मधील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्‍यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक झाले आहे. मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र शासन, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक २९/०६/२०२० रोजीच्‍या आदेशामध्‍ये त्‍या त्‍या जिल्‍हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्‍हाधिकारी यांना जिल्‍हयातील रुग्‍ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.

त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आठवडा बाजार बंद करण्‍यात यावा. आठवड्याच्‍या सातही दिवशी विवाह समारंभास परवानगी देणेबाबत संबंधित तालुक्‍याचे तहसिलदार यांनी त्‍यांच्‍या तालुक्‍याची कोविड १९ संदर्भात परिस्थिती पाहून कंटेंटमेंट झोन व हॉट स्‍पॉट वगळून इतर ठिकाणी परवानगी देतेवेळी पुढील बाबींची अंमलबजावणी करावी.  लग्नसमारंभ मध्‍ये जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. लग्नसमारभांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध RTPCR Test नकारात्मक (निगेटीव्ह) असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. RTPCR Test नकारात्मक (निगेटीव्ह) असल्याचे प्रमाणपत्र नाही व लसीकरण केलेले नाही असा सेवा देणारा व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यास रक्कम रूपये १,०००/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये १०,०००/- दंड आकारला जाईल. लग्नसमारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लघंन झालेस सदर परिसर हा सिल केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी कोव्हीड -१९ अधिसूचना संपेपर्यत रद्द केली जाईल.

सिंधुदुर्ग जिल्‍हयातून इतर जिल्‍हयात आंबा वाहतूक करणारे वाहन चालक, वाहक, कर्मचारी यांनी आंबा वाहतूक करुन जिल्‍हयात प्रवेश करतेवेळी चेकपोस्‍ट लगतच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्र (PHC) किंवा ग्रामीण रुग्‍णालय (RH) येथे स्‍वॅब टेस्‍ट करुन घ्‍यावी. स्‍वॅब टेस्‍टचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत संबंधित व्‍यक्‍तींनी गृह अलगीकरणात रहायचे आहे. आंबा बागायतदार, व्‍यावसायिकांनी त्‍यांचे बागेची राखण करणे, आंबा काढणे अशा  कामाकरिता देशातील, राज्‍यातील इतर भागातून दाखल झालेल्‍या, होणा-या कामगारांची लगतच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्र (PHC) किंवा ग्रामीण रुग्‍णालय (RH) येथे स्‍वॅब टेस्‍ट करुन घ्‍यावी. स्‍वॅब टेस्‍टचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत संबंधित व्‍यक्‍तींनी गृह अलगीकरणात रहायचे आहे.

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील  दिनांक ०४ एप्रिल २०२१ रोजीचे आदेश, तसेच या कार्यालयाकडील दिनांक ०५ एप्रिल २०२१ नुसार ज्‍यांना ज्‍यांना RTPCR चाचणी करुन घेणे आवश्‍यक आहे त्‍यांनी RTPCR चाचणी करुन अहवाल सोबत ठेवणे आवश्‍यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी आज दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eight =