You are currently viewing राजस्तरीय गीत गायन स्पर्धेत बांदेकर माता – पुत्राचे सुयश

राजस्तरीय गीत गायन स्पर्धेत बांदेकर माता – पुत्राचे सुयश

कोल्हापूर येथील शिवाजी भोसले प्रतिष्ठान आयोजित, राज्यस्तरीय ,गीत गायन स्पर्धेमध्ये बांदा केंद्र शाळा नंबर एक मधील इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने बाल गटातून द्वितीय क्रमांक तसेच त्याची आई गौरी नितीन बांदेकर यांनी खुल्या गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या मायलेकराच्या जोडीने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसे पटकावली आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर आणि ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. विविध स्तरांतून या माता-पुत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा