You are currently viewing मुबंई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी…

मुबंई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साजरी…

सावंतवाडी

मुबंई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रा. अमर निर्मळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.

यावेळी प्रा. अमर निर्मळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजकार्यकर्ता म्हणून बाबासाहेबानी आयुष्यभर जी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही तत्वमूल्ये जपली. त्याप्रमाणेच आपणही समाजातील वंचित घटकासाठी काम करताना ही तत्वमूल्ये जपली पाहिजेत. कारण समाजाच्या सर्वांगिण विकास प्रक्रियेला त्याशिवाय गती मिळणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे राष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वपूर्ण असल्याने त्यांच्या वैचारिक अधिष्ठानावर नवी पिढी घडवली पाहिजे असे विचार या जयंती कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा