You are currently viewing सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित वधुवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मेळाव्याचे उद्घाटन भंडारी समाज जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंडारी महासंघ जिल्हा सचिव विकास वैद्य, कार्याध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, सदस्य जयप्रकाश चमणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, उपाध्यक्ष प्रसाद आरविंदेकर, गुरुनाथ पेडणेकर, बाळा आकेरकर, सचिव दिलीप पेडणेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, सदस्य सतीश नाईक, महिलाध्यक्षा शीतल नाईक, समता सुर्याजी, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष ॲड. शाम गोडकर, हनुमंत पेडणेकर, निलेश कुडव, दीपक जोशी, नामदेव साटेलकर, रवि तळाशिलकर, राजू आचरेकर, पंकज पेडणेकर, बाबु मुणगेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, शरद पावसकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, राजाराम गवंडे, सुनिल नाईक, गौरवी पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून इच्छुक वर वधूंनी आपली नोंदणी केली. या मेळाव्याचे वैशिष्टय म्हणजे डिजीटल पद्धतीने या वेळी वधूवरांची ओळख डिस्प्लेवर करण्यात आले. यावेळी वधू वर व त्यांचे पालक व सहकारी तसेच भंडारी जातीबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 9 =