You are currently viewing शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन

*शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन*

हणमंत वडिये, तालुका कडेगाव येथील येरळामाई जनसहयोग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सांगली प्रस्तुत हसत खेळत विज्ञान या प्रयोगाचे मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हणमंत वडीये या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. ॲड सुभाष पाटील यांनी या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या कार्यकर्त्या त्रिशला शहा व आशा धनाले यांनी सुमारे अडीच तास विद्यार्थ्यांना नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून छोट्या प्रयोगाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा अंगीकारावा आणि चमत्कारांचे सादरीकरण कसे केले जाते व याला जादूटोण्याची जोड देऊन यातून समाजाची कशी फसवणूक होते याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासावा आणि कोणत्याही गोष्टीची चिकित्सक वृत्तीने कशी चौकशी करावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थी शिक्षक आणि गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित पाहुणे, मान्यवर आणि शाळेतील शिक्षक या सर्वांचे स्वागत अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे प्रकाशित पुस्तके भेट देऊन करण्यात आले. लहान विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत श्री कनुंजे सर यांनी केले व प्रास्ताविक येरळामाई जनसहयोग फाउंडेशनचे सहसचिव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष डॉ. शंकर केशव माने यांनी केले. आभार मुख्याध्यापक श्री. सुभाष पाटील यांनी मानले. फाउंडेशनचे सदस्य श्री. सिद्धनाथ मोरे व इतर नागरीक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕

*माई ह्युंदाई*

*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢

*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*

*MAI HYUNDAI*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फोन : 9623245800*

*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा