You are currently viewing महामानव भिमरायां करू वंदन

महामानव भिमरायां करू वंदन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संगीतकार, गीतकार गायक श्री अरुण गांगल यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिलेली मानवंदना*

*भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*

महामानव भिमरायां करू वंदन
लोकोद्धारासाठी त्यांनी वेचिले जीवन।।ध्रु।।

बुद्ध धर्म स्वीकारून,आदर्श जीवन
चळवळीने करती जनजागरण
वंचितांना विश्वास राहे,मिळे सन्मान।।1।।

संस्कृती सांभाळती आदरच राखून
द्रष्टे,अन्याय्य रूढींचा बिमोड करून
सार्वभौम,बंधुत्व जपण्या शिकवण।।2।।

भारताची लोकशाही केली बलवान
प्रसंगात”घटना” करी मार्गदर्शन
विश्वात भारतीय घटनेचा सन्मान।।3।।

गरिबांचे दुःख जाणती,आसू पुसून
शिक्षणाची महती सर्वांना पटवून
अन्याया विरुद्ध करती भीम गर्जन।।4।।

लेखणी,वाणी तेज असे सूर्या समान
मिळाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न
त्यांचे विचार सदा प्रेरणा,स्फूर्ती पूर्ण।।5।।

काव्य: श्री अरुण गांगल कर्जत, रायगड.महाराष्ट.पिन.410 201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 8 =