You are currently viewing वार्धक्य

वार्धक्य

जागतिक साहित्य कला व्यक्तीच विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी यांची अप्रतिम काव्यरचना

वय वाढत जाईल तश्या
दिसत जातील वार्धक्याच्या खुणा
क्षणभर असतो बहर फुलण्याचा,
समजवं तुझ्या वेड्या मना

लाज वाटू देऊ नकोस
जोमात उडणाऱ्या पांढऱ्या केसांची
मनाने रहा सदैव तरुण
काळजी नको कोणत्याच वेषाची

जीवनगाणे आपल्या मधुर स्वरात ओठावर येऊ दे अलगद
होऊ नकोस तेव्हा व्यथित
संपला म्हणून फुलातला मध

जगासाठी तू कुणीही नसु दे
तुझ्यासाठी आहेस तूच सगळं
रुबाबात मिरव तुझी नवलाई
दाखव रूप तुझ आगळं

मुरल्या नंतर फळ होते
आणखीच जास्त नरम,गोड
जागव तुझ्यातला प्रेमाचा ओलावा,चांगुलपणाची हवी त्याला जोड

वसंत आला आयुष्यात तरी
पानगळ ही होणार असते
काळाच्या ओंजळीतून तुटलेले पान
परत कधीच येत नसते.

*सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + six =