You are currently viewing पर्यटनमंत्र्यानी सिंधुदुर्ग जिल्हयाला 100 मिनी बस द्याव्यात – चंद्रशेखर उपरकर

पर्यटनमंत्र्यानी सिंधुदुर्ग जिल्हयाला 100 मिनी बस द्याव्यात – चंद्रशेखर उपरकर

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील पर्यटन वाढणयासाठी राज्याचे पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांनी जिल्हयाला पर्यटन निधीतुन 100 मिनी बसेस टप्प्याटप्याने द्याव्यात अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन फेडरेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या चाकरमानी आणि पर्यटकांची दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र एसटी बंद असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणे आणि पर्यटनाचा आनंद लुटूंन परत येणे वाहतूक व्यवस्थेअभावी खर्चिक आणि वेळेचा अपव्यय करणारी होत आहे. राज्य सरकारने पर्यटनवाढीसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचे सांगितले जाते तसेच नियोजन मंडळाकडे सुद्धा विविध योजनांसाठी भरपूर निधिची मागणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तोटयात गेलेल्या एसटी महामंडळाला दिलासा देण्यासाठी या बसेस सिंधुदुर्ग एस टी विभागाकडे देणयात याव्यात. त्यातील मालवण 20, देवगड 15, कणकवली 15, कुडाळ 10, वेंगुर्ले 10, सावंतवाडी 15, दोडामार्ग 10, वैभववाड़ी 5 अशाप्रकारे वाटप करून पर्यटन बस म्हणून वापर केल्यास नागरिक व विद्यार्थ्याना सुद्धा उपयोग होईल. या बसमध्ये तिकीटात कुणालाही कसलिही सवलत ठेऊ नये. याबाबत एसटी परिवहन मंत्री व पर्यटन मंत्री यानी एकत्रित विचार करावा, असेही उपरकर यानी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + seven =