– सहायक आयुक्त समाज कल्याण -दीपक घाटे
सिंधुदुर्गनगरी
वीरशेव-लिंगायत समाजासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकारी व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकुण दोन महात्मा बसेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थानी 22 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
सन 2018 -19,2019-20,2020-21 व 2021-22 या चार वर्षाचा एकत्रित घेण्यात येणार असल्याने सर्व व्यक्ती व संस्था यांनी चार वर्षासाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्यात यावेत. तसेच या अर्जाची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी असल्याने, इच्छुक संस्था व व्यक्ती यानी सन 2018-19,2019-20,2020-21 व 2021-22 अशा चार वर्षासाठी दोन वेगवेगळे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे दि 20 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावेत.