You are currently viewing मालवणात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मालवणात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मालवणात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लायन्स क्लब मालवण, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण

लायन्स क्लब मालवण, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स पुरस्कृत अॅपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२५ मे रोजी सकाळी १० ते २ पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये खालील लक्षणे व आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तपासण्या व उपचार उपलब्ध आहेत. यात उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर), मधुमेह (डायबेटीस), ब्लड कॅन्सर/कॅन्सर रुग्ण, थायरॉईड ग्रंथीची आजार, मानेतील गाठ/आवाज घोगरा होणे, हृदय, पोट व मेंदू विकार, घशांचे आजार, तोंडातील बरी न होणारी जखम / तोंडात चट्टे उठणे, किडणीचे आजार (मुतखडा, रक्तातील क्रियाटीन वाढणे), लहान मुलांचे आजार, पायातील वक्राकार रक्तवाहीन्यांचा आजार (व्हेरीकोज व्हेन्स), स्त्रीरोग (स्तनातील गाठ, गर्भाशयाचे विकार, अनियमित रक्तस्त्राव) यांचा समावेश आहे. तरी अधिक माहितीसाठी अनुष्का चव्हाण 9404546337, झांट्ये हॉस्पीटल – ०२३६५ २५३६२८, अंकूर हॉस्पीटल- ०२३६५ २५२१६, रेडकर हॉस्पीटल – ९४०५१७०३७६ / ७५८८५४४७०० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा