सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपस्थितांना दूध कोल्ड्रिंक वाटप.
सावंतवाडी
अनेक गावातून हजारोच्या संख्येने सावंतवाडी समाज मंदिराचे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आलेल्या व रखरखत्या उन्हामध्ये बसलेल्या आंबेडकर प्रीमिय्यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध कोल्ड्रिंक चे वाटप करण्यात आले यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील व रवी जाधव यांनी पुढाकार घेतला.
यासाठी उपक्रमासाठी वैयक्तिकरित्या आर्थिक सहाय्य करणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील, लक्ष्मण कदम, रवी जाधव अध्यक्ष सतीश बागवे व शरदनी बागवे यांनी पुढाकार घेतला.
या उपक्रमासाठी समीरा खलील व लक्ष्मण कदम यांचे खूप मोठे सहकार्य लाभले. तसेच राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवाजी चौक येथील संध्याकाळच्या रॅलीतील आंबेडकर प्रीमिय्यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. यासाठी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर व रवी जाधव यांनी पुढाकार घेतला.