You are currently viewing रामनवमी…

रामनवमी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांची रामनवमी निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*रामनवमी*

 

चैत्र शुद्ध नवमीस राम जन्मला।

आयोध्या नगरीत आनंद जाहला।

सातवा अवतार भगवान विष्णुचा।

प्रकाशली धरा अंधार निमाला ।।

 

कौसल्येचा राम आत्म्याचा प्रकाश।

एकपत्नी एकवचनी एकबाणी ।

हिंदु संस्कृतीचा सच्चा आधारस्तंभ।

रामराज्यात नव्हती भीतीची नावनिशाणी…।।

 

रामनवमीस सोहळा साजरा जन्मोत्सवाचा ।

नक्षत्र पुनर्वसु वेळ भर मध्यान्हीची ।

घरोघरी सजतो पाळणा रामजन्माचा ।

सजावट चंपा केवडा सायलीची।।

 

सुवासिनी मधुर स्वरे पाळणा गाती ।

सुंठवड्याचा महाप्रसाद जनी वाटती।

काकुस्थ करुणानिधी मर्यादा पुरुषोत्तम।

आदर्श रामाचा प्रेमभावे पुकार करती।।

 

श्रीलंकेत वध केला दुष्टप्रवृत्ती रावणाचा ।

अशोकवनी बंदीस्त महापतीव्रता सीता ।

सुटका होउनी भेट जाहली रामसीतेची ।

वनवासीचीही संपली चवदा वर्षे आता..।।

 

राम लखन सीता सवे हनुमान परतले।

अयोध्यानगरी आनंदीली दुमदुममली ।

दिवस रामनवमीचा मंगलमय रामजन्माचा।।

प्रजाजनांच्या ह्रदयी हर्षभरी गुढी ऊभारली..।।

 

सौ. राधिका भांडारकर

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा