You are currently viewing आपल्या मालवणी, कोकणी माणसांचे भव्य प्रदर्शन सावंतवाडीत

आपल्या मालवणी, कोकणी माणसांचे भव्य प्रदर्शन सावंतवाडीत

*वोकल फॉर लोकल* अर्थात *स्थानिकांच्या उत्पादनांना पाठिंबा* देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या शॉपिंग फेस्टिवलला आपणां सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे विक्री प्रदर्शन शुक्रवार व शनिवारी (29 व 30 ऑक्टोबर) रोजी सावंतवाडी येथील कळसुलकर शाळेत आयोजित करण्यात आले आहे.

दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या, मेणबत्ती, उटणे, साबण, रांगोळी, शोभेच्या वस्तू, गिफ्ट आर्टिकल, कपडे, साड्या, ड्रेस, पडदे, पीलो कव्हर, बेडशीट, चादर, कोकणी मेवा, मसाले, पिठे अशा बऱ्याच वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जनतेने या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि या व्यावसायिकांकडून खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे, सहकार्य करावे हि विनंती.
अधिकमहितीसाठी :997166642४ संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 4 =