You are currently viewing मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका निहाय दौरा कार्यक्रम…

मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका निहाय दौरा कार्यक्रम…

सिंधुदुर्गनगरी  

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक हे माहे ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत तालुका निहाय दौरा करणार आहेत. या दौरा कार्यक्रमामध्ये शिकावी व पक्के लायसन्स, वाहकाचा परवाना, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले संबंधी चाचणी सारथी 4.0 वर ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारण्याचे काम केले जाणार आहे. सदर अर्ज सकाळी 10 ते 1.00 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत.

       सदर दौऱ्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. माहे ऑक्टोबर 2020 मध्ये सावंतवाडी तालुक्यात 6 व 14 तारखेस, मालवण मध्ये 7 तारखेस, कणकवली मध्ये 8 व 15 तारखेस, देवगड तालुक्यात 9 तारखेस, वेंगुर्ला तालुक्यात 13 तारखेस, दोडामार्ग  – 16, कुडाळ – 19 आणि वैभववाडी – 20 तारखेस दौरा आहे. माहे नोव्हेंबर 2020 मध्ये 3 व 11 तारखेस सावंतवाडी, 4 तारखेस मालवण, 5 व 12 तारखेस कणकवली, 6 तारखेस देवगड, 10 तारखेस वेंगुर्ला, 17 तारखेस दोडामार्ग, 18 तारखेस कुडाळ, 19 तारखेस वैभववाडी. माहे डिसेंबरमध्ये सावंतवाडी 3 व 11 डिसेंबर, मालवण – 4, कणकवली 8 व 15, देवगड – 9, वेंगुर्ला 10, दोडामार्ग 16, कुडाळ – 17, वैभववाडी – 18 डिसेंबर या प्रमाणे दौरा होणार आहे.

       या दौऱ्यावेळी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी मास्क, हातमोजे व स्वतःचे सॅनिटायझर घेऊन कार्यालयात यावे. कोविड – 19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे.

       तसेच सदर तारखांना कोणतीही सुट्टी असल्यास सदर ठिकाणाचा दौरा इतर ठिकाणचा दौरा आटोपल्यानंतर लगेच कामाच्या दुसऱ्या दिवशी होईल. अर्जदारांची दैरसोय टोळण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 4 =